शेवटच्या ब्रिटीश सैन्याने भारत सोडलं त्याला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत पर्यटन विभागातर्फे 'लाइट ॲण्ड साऊंड' शोचं उद्घाटन करण्यात आलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ब्रिटीश सैन्य माघारी परतल्याच्या निमित्ताने आयोजित या शोमध्ये भारताचा इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक पाहायला मिळाली.